करोनामुळे देशभरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देशात अंतर्गत सीमा आखल्या गेल्या. अन्न- वस्त्र, निवारा, वाहतुकीची साधने अशा कोणत्याही मूलभूत सुविधा नाकारली गेलेली अनेक माणसे या काळात परागंदा झाली. अनेकांचे रोजगार गेले. लाखों लोकांनी आपआपल्या घरी परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. लॉकडाउनच्या काळातील हे भयाण वास्तव आता ‘भीड’ या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, रोखठोक वास्तव आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून काही लोकांनी हा चित्रपट देशविरोधी असल्याचं म्हणत सोशल मीडियावर कॉमेंट करायला सुरुवात केली. नेटकऱ्यांच्या या कॉमेंटवर अभिनेते पंकज कपूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : प्रेमभंगानंतर केलेलं टक्कल, किसिंग सीनसाठी ४७ रिटेक; ‘मि.परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दलच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या

इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना पंकज कपूर म्हणाले, “आपल्या समाजात एक थेंब जरी पाऊस पडला तरी लोक मान्सून दाखल झाल्याची घोषणा करणारी लोक आहेत, चित्रपटातही तुम्हाला अशीच लोक बघायला मिळतील. आपण खूप उतावीळ आहोत आणि एखाद्याबद्दल लगेच ग्रह निर्माण करतो. तुम्ही तुमचं मत अवश्य मांडा पण आधी चित्रपट बघा. एक छोटा टीझर पाहून तुम्ही या चित्रपटाला राजकीय चित्रपट असं लेबल चिकटवू शकत नाही. हा एक अभ्यासपूर्ण चित्रपट आहे ज्यात समाजाच्या मानसिकतेचं चित्रीकरण आपल्याला बघायला मिळतं.”

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंकज कपूर यांचं पात्र एका मुस्लिम व्यक्तीकडून अन्न घेण्यास नकार देताना दिसतं, यावरूनही सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. चित्रपटात मात्र या सीनच्या दोन्ही बाजू मांडण्यात आल्या असल्याचं पंकज कपूर यांनी स्पष्ट केलं आहे. हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटात राजकुमार राव हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि भूमी पेडणेकर, दिया मिर्झा यांचीही यात मुख्य भूमिका आहे. याबरोबरच पंकज कपूर, आशुतोष राणा, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट २४ मार्चला देशभरात प्रदर्शित होणार आहे.