राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेदरम्यानच्या एका भाषणात छठपूजेला विरोध केल्याचं आपल्याला आठवत असेल. आजही आपण छठपूजेविषयीच जाणून घेणार आहोत पण एका राजकीय नेत्याच्या नव्हे तर एका अभिनेत्याच्या दृष्टिकोनातून. छठपूजा ही उत्तर भारतीय लोकांमध्ये अत्यंत पवित्र अशी पूजा मानली जाते. त्याच पूजेबद्दल बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

मधली काही वर्षं छठपूजेच्या दिवशी पंकज हे त्यांच्या गावी जात असत, पण सध्या कामात प्रचंड व्यस्त असल्याने त्यांना गावी जाऊन पूजा करण्याची संधी मिळत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार पंकज यांनी नुकतंच याबद्दल वक्तव्य केलं आहे ते म्हणतात, ” छठपूजा करताना सूर्याची पूजा महत्त्वाची असते. आपल्याला जगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज आहे याबद्दल आपल्याला जाणीव होते. या माध्यमातून आपण निसर्गाची उपासना करतो. निसर्ग जे आपल्याला देतो त्याबद्दल आपण त्याचे आभार मानतो. आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे आणि पर्यावरणाची नीट काळजी घेतली पाहिजे हीच शिकवण छठपूजेतून दिली जाते.”

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…

आणखी वाचा : “माझे वडील सदैव ‘जय मोदी’ असा जयघोष करतात” – कंगना रणौत

याबद्दल बोलताना पंकज यांनी त्यांच्या गावातील छठपूजेच्या आठवणीही सांगितल्या. यावर्षी म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी पंकज हे त्यांच्या जुहू येथील निवासस्थानीच छठपूजा करणार आहेत. शिवाय या पूजेदरम्यान लहान असताना पंकज वेगवेगळ्या छोट्या नाटकातही सहभाग घ्यायचे यामुळेच त्यांना या पवित्र पूजेबद्दल आपुलकी आहे.

‘मीमी’ ‘शेरदिल’सारख्या चित्रपटातून पंकज यांनी त्यांची छाप बॉलिवूडवर पाडली आहे. शिवाय ओटीटी विश्वातही त्यांच्या नावाचा प्रचंड दबदबा आहे. ‘क्रिमीनल जस्टीस’ या वेबसीरिजमधील त्यांच्या कामाची खूप प्रशंसा होते. याबरोबरच त्यांच्या ‘मिर्झापुर’मधल्या कालीन भैय्याचीसुद्धा प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. लवकरच याचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader