अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाचा २००० साली ‘हेराफेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत पार पडले. या तिसऱ्या भागाबद्दलची माहिती अभिनेते परेश रावल यांनी नुकतीच एका मुलाखतीत दिली आहे.
परेश रावल यांनी हेरा फेरी चित्रपटात बाबुराब आपटे हे मराठमोळे पात्र साकारले आहे. हे पात्र आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. त्यांनी मिडडेला दिलेल्या मुलाखतीत चित्रीकरण व चित्रपटाबद्दल सांगितले आहे. ते असं म्हणाले, या चित्रपटात “हे तिघे जागतिक स्तरावर हेराफेरी करताना दिसणार आहेत.” तसेच कार्तिक आर्यनदेखील या चित्रपटाचा भाग असणार आहे या चर्चांवर ते म्हणाले अद्याप याबाबत माझ्याकडे माहिती आली नाही. या चित्रपटाचे मुंबईत तसेच दुबई, लॉस एंजेलिससारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.
कॅनडाच्या नागरिकत्वावरून होणाऱ्या टीकेवर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला…
काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होतेआता अखेर चित्रपटाच्या टीझरचे चित्रीकरण झाले असून या त्रिकुटांचा फोटो व्हायरल होत आहे.
फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट बघत आहेत.