Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा चार दिवसांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. २९ मेला सुरू झालेला हा सोहळा १ जूनपर्यंत इटली आणि फ्रान्समध्ये चालला. अंबानींनी ७,५०० कोटींच्या क्रूझवर आपल्या लाडक्या लेकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला होता. ८०० पाहुण्यांव्यतिरिक्त ६०० कर्मचारी देखभालीसाठी क्रूझवर ठेवण्यात आले होते. बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळींनी अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आवर्जुन हजेरी लावली होती. आता सर्व पाहुण्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आपल्या लेकीसह मुंबईत परतले आहेत. याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून पुन्हा एकदा राहाच्या गोड अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि राहा मुंबईत परतानाचा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. पहिल्या व्हिडीओत, रणबीर आपल्या लाडक्या लेकीला घेऊन गाडीत बसताना दिसत आहे. तर आलिया त्याच्या मागे पाहायला मिळत आहे. याच वेळी राहाने बाबा रणबीरच्या गालावर किस केलं आणि गोड हसताना दिसली.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

हेही वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेता झाला बाबा, आनंदाची बातमी देत म्हणाला, “आमच्या लाडक्या…”

दुसऱ्या व्हिडीओमध्ये रणबीर-आलिया आपल्या लेकीसह गाडीत बसलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी रणबीरकडे असलेली लाडकी लेक गाडीबाहेर असलेल्या कॅमेरांकडे एकटक बघताना दिसत आहे. तेव्हा रणबीर राहाला त्रास होऊ नये म्हणून सगळ्या पापराझींना विनम्रपणे गाडीपासून बाजूला होण्यासाठी सांगताना पाहायला मिळत आहे. याच वेळी पुन्हा एकदा राहा आपल्या गोड अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. काही वेळाने कॅमेरांकडे पाहून खुदकन हसते. तेव्हा रणबीर देखील तिला पाहून हसायला लागतो. सध्या रणबीर, आलिया आणि राहाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानची ‘तेरे नाम’मधील राधेसारखी हेअरस्टाइल, रणबीर कपूरबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

हेही वाचा – ‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर, पाहा Inside फोटो

अनंत-राधिकाचं लग्न कधी?

दरम्यान, मुकेश अंबानी व नीता अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. १२ जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये अनंत राधिका मर्चंटबरोबर सात फेरे घेणार आहे. तसंच इथेच इतर कार्यक्रम आणि रिसेप्शन देखील पार पडणार आहेत. १३ जुलैला रिसेप्शन सोहळा असणार आहे.

Story img Loader