आज लोकसभा निवडणूक २०२४मधील पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघासह कल्याण, ठाणे आणि भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे याठिकाणी मतदान होत आहे. सामान्य नागरिकांसह इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी मतदान करून आपला हक्क बजावला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामधील अभिनेता रणबीर कपूरच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर अभिनेता रणबीर कपूरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत रणबीरसह ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, शर्मन जोशी पाहायला मिळत आहे. यावेळी तिन्ही अभिनेते शाई लावले बोट दाखवून पापाराझींना पोझ देतात. त्यानंतर रणबीर खाली वाकतो आणि प्रेम चोप्रा यांच्या पाया पडतो. मग गळाभेट करतो. शिवाय रणबीर शर्मन जोशीला देखील मिठ्ठी मारून दोघांचा निरोप घेतो. रणबीरच्या याच कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस,” म्हणणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर संतापल्या, म्हणाल्या, “भाऊ…”

रणबीर कपूरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “रणबीर खूप आदर करतो”, “याचे संस्कार पाहा”, “हा खूप साधा माणूस आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. या व्हिडीओमुळे रणबीरच्या संस्काराविषयी बोललं जात आहे.

पण दुसऱ्याबाजूला रणबीर कपूरबरोबर पत्नी, अभिनेत्री आलिया भट्ट मतदान करताना दिसली नाही, त्यामुळे वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. आलिया भट्ट कुठे आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “आलिया भट्टकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्यामुळे ती मतदान करू शकतं नाही.”

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

दरम्यान, आज दिवसभरात अक्षय कुमार, जान्हवी कपूर, राजकुमार राव, शाहरुख खान, आमिर खान, फरहान अख्तर, अमिताभ बच्चन, सान्या मल्होत्रा, शाहिद कपूर, सुनील शेट्टी, रेखा, नेहा धुपिया, विद्या बालन, परेश रावल, आर माधवन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, गोविंदा, वरुण धवन, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, इमरान हाश्मी, हृतिक रोशन अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी मतदान करून आपला हक्क बजावला आहे.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याच्या ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर व साईचा राम-सीतेच्या लूकमधील फोटो व्हायरल झाला होता.