बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. रणबीर कपूर सध्या ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीरने नुकतंच आपल्या वाईट काळाबद्दल भाष्य केलं आहे.
रणबीर कपूरने आजवर ‘बर्फी’, ‘संजू’, ‘ये जवानी दिवानी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे मात्र त्याचे काही चित्रपट फ्लॉपदेखील ठरले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे बॉम्बे वेलवेट, या चित्रपटाबद्दल इंडिया टुडेशी बोलताना तो असं म्हणाला, “मी खूपच समतोल साधणारा माणूस आहे, मला कधीच एकदम अति किंवा कमी असं वाटत नाही. माझ्या प्रत्येक चित्रपटाच्यावेळी माझी आई मला विचारत असते “तू खुश आहेस का?” “तू दुःखी आहेस का?” पण मी व्यक्त होत नाही. मला असं वाटतं ‘बॉम्बे वेलवेट’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा माझा वाईट काळ चालू होता.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
“इंडस्ट्रीमध्ये आता…” बॉलिवूडमधील ‘या’ गोष्टीबद्दल रणबीर कपूरने व्यक्त केली खंत
‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर अनेक ठिकाणी फिरत आहे. या प्रमोशनमध्येच त्याने सोशल मीडियावर सक्रीय नसण्यामागचं कारण सांगितलं आहे तो असं म्हणाला, माझं हे म्हणणं आहे की सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला मनोरंजन करावे लागते आणि माझ्यात ती गोष्ट नाही. मला असं वाटतं आम्ही जाहिराती करतो, मार्केटिंग करतो, चित्रपट करतो कुठे ना कुठेतर लोक आम्हाला बघून कंटाळा असतील आणि ते म्हणत असतील आणखीन काहीतरी वेगळे बघुयात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.