बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्या वर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहिट ठरला. तसेच काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की तो भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर येणाऱ्या बायोपिकमध्ये झळकणार आहे, यावरच त्याने आता भाष्य केलं आहे.

नुकताच रणबीर कपूर आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकाता येथे गेला होता. त्यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्याला सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो असं म्हणाला, “सौरव गांगुली ही व्यक्ती केवळ देशातच नव्हे तर जगभरातील मोठ्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांच्यावरचा बायोपिक हा कायमच स्पेशल असेल. दुर्दैवाने, मला या चित्रपटाबाबत विचारण्यात आलेले नाही. माझ्यामते या चित्रपटाचे निर्माते अजून पटकथा लिहित आहेत.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

सोशल मीडियावर व्हायरल होणारा शाहरुख खानचा फोटो कोणत्या चित्रपटातला आहे? ओळखा पाहू

सौरव गांगुलीवरच्या बायोपिकवर भाष्य केल्यानंतर तो असं म्हणाला की, “मी गेली ११ वर्ष किशोर कुमार यांच्या बायोपिक वर काम करत आहे. यावर काम सुरु आहे अनुराग बसू आणि मी आशा करतो की हा माझा पुढील बायोपिक असेल. परंतु आतापर्यंत मला दादावर बायोपिक बनवण्याबद्दल काहीही ऐकले नाही. तर, मला माहित नाही” असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

Video : “गरोदर आहेस का?” स्टायलिस्ट साडीत हुमा कुरेशीचा बोल्ड अंदाज; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.

Story img Loader