बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या खूप चर्चेत आहे. २३ नोव्हेंबरला त्याचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात रणबीरने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटाच्या कथेबरोबर यातील गाणीही चांगलीच गाजली. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

एककीडे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे चित्रपटात दाखवण्यात आलेल्या हिंसेवरूनही जोरदार टीका करण्यात आली. अनेकांनी हा चित्रपट महिलाविरोधी असल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ रणबीरच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. आतापर्यंत रणबीरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र ‘अ‍ॅनिमल’एवढी कमाई याअगोदर त्याच्या कोणत्याच चित्रपटाने केली नव्हती. आता ‘अ‍ॅनिमल’नंतर रणबीरने आपल्या फीमध्ये वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे.

onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Atul Save
Atul Save : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तो निर्णय आम्हाला मान्य असेल”
Aishwarya Narkar & Madhura Joshi kissik song Dance
Video : ‘पुष्पा २’च्या ‘किसिक’ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त अंदाज! मधुरा जोशीसह केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?
Sanjay Shirsat On Guardian Minister Post
Sanjay Shirsat : खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
sanjay shirsat
Maharashtra Cabinet Portfolio Distribution : महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच होणार? विधान परिषदेत शिवसेनेच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अ‍ॅनिमल’ला मिळालेल्या यशानंतर रणबीरने आपली फी ३० कोटी रुपयांनी वाढवली आहे. आता तो एका चित्रपटासाठी तब्बल ६६ कोटी रुपये मानधन आकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी त्याने ७० कोटी रुपये मानधन घेतले असल्याची माहिती समोर आली होती. मानधनात वाढ केल्याबद्दल रणबीरकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

२०२३ हे वर्ष रणबीरसाठी खूप चांगले गेल्याचे बघायला मिळाले. गेल्या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. रणबीरचा मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २२० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात त्याच्याबरोबर श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका होती; तर रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने जगभरात ९१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Story img Loader