बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. रणबीर कपूर सध्या ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्ताने तो नुकताच कपिल शर्माच्या कार्यक्रमात गेला होता. तिथे त्याने बॉलिवूडबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडचे कलाकार चित्रपटांच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये जात असतात, नुकतीच रणबीर कपूरने या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा तो बॉलिवूडबद्दल बोलताना असं म्हणाला, “या इंडस्ट्रीमध्ये आता आपलेपणा राहिला नाही. जिथे सगळे कलाकार चित्रपटाच्या यशानिमित्त अथवा सणानिमित्त एकत्र येऊन भेटत असतं. माझ्यामते तो काळ आता राहिला नाही, आम्ही सगळे त्याला मिस करत आहोत. जेव्हा तुम्हाला पूर्ण इंडस्ट्रीकडून पाठिंबा मिळत असे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली. त्याच्या या प्रतिक्रियेवर कपिलनेदेखील सहमती दर्शवली आहे.

“जर चित्रपट प्रदर्शित केलात तर…” शाहरुखच्या ‘पठाण’ विरोधात बांगलादेशमधील थिएटर मालक एकवटले

या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो ठिकठिकाणी फिरत आहे, या प्रमोशनमध्येच त्याने सोशल मीडियावर सक्रीय नसण्यामागचं कारण सांगितलं आहे तो असं म्हणाला, माझं हे म्हणणं आहे की सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला मनोरंजन करावे लागते आणि माझ्यात ती गोष्ट नाही. मला असं वाटतं आम्ही जाहिराती करतो, मार्केटिंग करतो, चित्रपट करतो कुठे ना कुठेतर लोक आम्हाला बघून कंटाळा असतील आणि ते म्हणत असतील आणखीन काहीतरी वेगळे बघुयात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranbir kapoor open up about bollywood facts and dark side spg