बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. नुकताच त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाचा लूक समोर आला आहे. यावर बरीच चर्चा झाली आहे आता त्याच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सुरु होती. आज अखेर एका कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी पत्रकारांनी रणबीरला काही प्रश्न विचारले.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

सुनील शेट्टीची लेक आता होणार केएल राहुलची पत्नी; तिच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

एका पत्रकाराने विचारले, ‘ये जवानी है दिवानी’ नंतर रणबीर ‘तू झुठी मैं मकर’ सारखा रोम कॉम चित्रपट करत आहे काय सांगशील? त्यावर अभिनेत्याने उत्तर दिले, “ये जवानी है दिवानी’ नंतर मी अशा प्रकारचा चित्रपट केला नाही कारण अनुभवासाठी मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करावे लागले. जर हा चित्रपट चालला तर मी अशाप्रकारचे चित्रपट करिन पण जर चित्रपट चालला नाही दिग्दर्शकाचा दोष आहे असे समजेन.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.

Story img Loader