बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. रणबीर कपूर सध्या ‘तू झुटी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणबीरने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत.
रणबीर कपूर अभिनयाप्रमाणे त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत येत असतो. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत त्याने व्यसनांबद्दल सांगितले आहे. तो असं म्हणाला, “जेव्हा मी प्रथम सिगारेट ओढली होती तेव्हा ते माझ्या आईला समजले होते. तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता. माझ्या आईला खूप मोठा धक्का बसला होता. तिला असं वाटलं की मी हेरॉईन घेत आहे. तो म्हणाला की त्याने आईला समजवण्याचा प्रयत्न केला नाही की तो सिगरेट ओढणं बंद करेल. तो पुढे म्हणाला अर्थात तुम्हाला वाईट वाटतं. मी माफी मागितली, पण मला असं वाटतं शेवटी आपले पालकही हार मानतात.”
“मेहनत, सातत्य आणि….” ‘पठाण’ला मिळालेल्या यशावर शाहरुख खान भारावला; चाहत्यांचे मानले आभार
‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर अनेक ठिकाणी फिरत होता या प्रमोशनमध्येच त्याने सोशल मीडियावर सक्रीय नसण्यामागचं कारण सांगितलं आहे तो असं म्हणाला, “माझं हे म्हणणं आहे की सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला मनोरंजन करावे लागते आणि माझ्यात ती गोष्ट नाही. मला असं वाटतं आम्ही जाहिराती करतो, मार्केटिंग करतो, चित्रपट करतो कुठे ना कुठेतर लोक आम्हाला बघून कंटाळा असतील आणि ते म्हणत असतील आणखीन काहीतरी वेगळे बघुयात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.
दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ ला म्हणजे कालच प्रदर्शित झाला आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे. पहिल्यांदाच ही हटके जोडी मोठ्या पडद्यावर दिसली आहे. या चित्रपटात डिम्पल कपाडिया, बोनी कपूर यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.