बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असतात. कालच बॉलीवूडची बेबो म्हणजे करीना कपूरला राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. ‘राष्ट्रगीताला सावधान उभं राहतात, हाताहात पकडून उभं राहत नाहीत, हे कोणीतरी हिला सांगा,’ ‘जे लोकं शिक्षित नाहीत, त्यांना देखील राष्ट्रगीत गाताना कसं उभं राहतात हे माहित आहे’ अशा प्रतिक्रिया करीनाच्या त्या व्हायरल व्हिडीओवर उमटल्या होत्या. त्यानंतर आता तिचा भाऊ अभिनेता रणबीर कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मला आत्महत्या करावीशी वाटत होती”, लोकप्रिय अभिनेत्रीने मांडली व्यथा, म्हणाली, “माझी…”

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. माहितीनुसार, त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी राहा देखील आहे. यासंबंधीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – “डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता पण…”, ऐश्वर्या नारकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाल्या,”हे त्या लोकांसाठी…”

या सुट्टीच्या दरम्यान रणबीर-आलिया यूएस ओपन टेनिस चॅम्पियनशिप पाहण्यासाठी गेले होते. या स्टेडियम मधला रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हॉलीवूड अभिनेत्री मॅडलिन क्लाइन पाहायला मिळत आहे. यावेळी स्टेडियम मधला कॅमेरा जेव्हा मॅडलिनला कॅम्पचर करतो, तेव्हा रणबीर मधेच येऊन विक्ट्रीच साइन करतो. त्यानंतर लगेच बाजूला होतो. या व्हिडीओमधील रणबीरची कृती काही नेटकऱ्यांना आवडली आहे, तर काही नेटकऱ्यांना खटकली आहे.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आवडतं पुस्तक, नाटक अन् बरंच काही; ‘हा’ जुना व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “लक्ष्या मामा….”

हेही वाचा – ‘या’ तीन निकषांवर ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची निर्माती श्रुती मराठे स्वीकारते काम; म्हणाली…

एका नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘आरके संधी साधली.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “लग्नानंतरही सुधारला नाही. बालिशपणा करत आहे.” तसेच काही नेटकऱ्यांना रणबीरची ही कृती आवडली आहे.

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील दोन अवनींची हार्दिकबरोबरची मज्जा-मस्ती, पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, रणबीर-आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच आलियाच्या ‘बैजू बावरा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा रणवीर सिंहबरोबर झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranbir kapoor trolled for photobombs hollywood actress madelyn cline pps