बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच रणदीपने त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामबरोबर लग्नगाठ बांधली. मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार रणदीप व लिनचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच त्यांचा रिसेप्शन सोहळा मुंबईत पार पडला. या पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

रणदीप व लिनने २९ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये कुटुंबीय व जवळ्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर रणदीपने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार सहभागी झाले होते. या पार्टीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा- ‘अ‍ॅनिमल’नंतर बॉबी देओल करणार तमिळ चित्रपटात पदार्पण; सूर्याच्या ‘या’ बिग बजेट चित्रपटात साकारणार हटके भूमिका

दरम्यान, या पार्टीतला एक इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवदाम्पत्य रणदीप व लिन भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये लिन रणदीपच्या ‘हायवे’ चित्रपटातील ‘पटाखा गुड्डी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे; तर रणदीपच्या डान्सनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स करीत दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लग्नामध्येही रणदीप व लिनने मणिपूरचा पारंपरिक लूक परिधान केला होता. मणिपूरच्या मैतेई पद्धतीनुसार दोघांचा लग्नसोहळा पार पडला. आता रिसेप्शनमध्येही रणदीप व लिनच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. रिसेप्शनमध्ये लिनने मरून रंगाची साडी परिधान केली होती. लिनने डोक्यावर साडीच्याच रंगाची ओढणी घेतली होती आणि त्यावर सुंदर दागिने घातले होते; तर रणदीप काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला होता.