बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. नुकताचा एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. रणवीर हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या फॅशनसाठीसुद्धा चांगलाच चर्चेत असतो. नुकतंच रणवीरने ‘फिल्मफेअर मिडल ईस्ट अचीव्हर्स नाइट २०२२’ हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्याला या दशकाचा सुपरस्टार म्हणून गौरविण्यात आलं. या सोहळ्याला जान्हवी कपूर, गोविंदा, सनी लियॉनीसारख्या कित्येक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.

या सोहळ्यात रणवीरबरोबर त्याचे कुटुंबातील सदस्यदेखील हजर होते. जेव्हा रणवीरला हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा तो स्वीकारतान रणवीर खूप भावूक झाला. त्याचे स्ट्रगलिंगच्या काळातील दिवस आणि एकूणच त्याचा भूतकाळ त्याला आठवू लागला आणि भावूक होऊन त्याने आपले वडील जगजित सिंग भवनानी यांचे आभार मानले. मंचावर बोलताना रणवीरच्या डोळ्यात नकळत अश्रू आले आणि तो खूप भावूक झाला.

आणखी वाचा : दिवंगत अभिनेत्री एंड्रिला शर्माच्या हॉस्पिटलचं बिल १२ लाखांहून अधिक; अरिजित सिंगने पुढे केलेला मदतीचा हात

रणवीरचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. रणवीर आपल्या वडिलांना उद्देशून म्हणाला, “बाबा तुम्हाला ठाऊक आहे १२ वर्षांपूर्वी जेव्हा मी या क्षेत्रात येण्यासाठी धडपड करत होतो. त्यावेळी मला एक पोर्टफोलिओ बनवायचा होता. जेणेकरून मला प्रत्येकठिकाणी काम मागायला जाता येईल. पोर्टफोलिओचं बजेट तब्बल ५०००० होतं, मला ते फारच महाग वाटत होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होता की, बेटा तुला जे हवंय ते कर, तुझा बाबा सदैव तुझ्या मदतीसाठी उभा असेल.”

इतकंच नाही तर जेव्हा प्रथम एक ऑडिशन देऊन आल्यावर रणवीर निराश झाला होता तेव्हा त्याने आईच्या मांडीत डोकं ठेवून रडल्याची आठवणदेखील या मंचावर सांगितली. रणवीर हे बोलत असताना त्याच्या पालकांच्या डोळ्यातली अश्रु तराळले. याबरोबरच रणवीरने दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचेदेखील आभार मानले. रणवीर सिंग आता पुन्हा आलिया भट्टबरोबर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader