गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानाचा परिणाम विमान सेवेवर होताना पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक विमाने उशीराने उड्डाण घेत आहेत. याचा प्रवाशांना त्रास होत असून सोशल मीडियाद्वारे प्रवासी विमान कंपन्याविरोधात आवाज उठवतं आहेत. यामध्ये कलाकार मंडळी देखील पाहायला मिळत आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरीने देखील विमानाला १० तास उशीरा झाल्याने विमान कंपनी विरोधात तक्रार करणार असल्याचा दावा केला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता रणवीर शौरी विमान कंपनीवर आरोप करत म्हणाला की, “दुपारी २ वाजताच्या विमानाने रात्री उशीरा उड्डाण केलं. तोपर्यंत विमान कंपनीचे कर्मचारी प्रवाशांना खोटं सांगत होते की, लवकर विमान उड्डाण करेल. इंडिगोने आम्हाला काल सांगितलं होतं की, आमचं विमान दुपारी २ वाजता उड्डाण करणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व ८ जण २ वाजता विमानतळावर पोहोचलो. आमचं चेक-इन झालं आणि तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, खराब हवामानामुळे विमान ३ तास उशीरा आहे. याची अजिबात कल्पना विमानतळावर पोहोचण्यापूर्वी दिली नव्हती. पण आम्ही हवामानाची स्थितीपाहून कोणती तक्रार केली नाही. आम्हाला खरंच वाटलं की, कोणती तरी समस्या असेल. त्यामुळे पूर्णपणे सहकार्य करत होतो. कारण थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे कधी-कधी अशा समस्या उद्भवतात.”

हेही वाचा – शिवाली परब-निमिष कुलकर्णी प्रेमात? अभिनेत्रीने फोटोंसह शेअर केलेलं ‘ते’ कॅप्शन पाहून चाहते म्हणाले…

“३ तास उशीर झाल्यानंतर ५ वाजता विमान उड्डाण भरणार होतं. पण ५ वाजायच्या जवळपास आम्हाला सांगितलं की, विमान ३ तासांनंतर रात्री ८ वाजता उड्डाण होईल. अशातच माझ्या एका मित्राने इंडिगो वेबसाइटवरून जाऊन विमानाचं रुटीन तपासलं. त्यामध्ये ज्या विमानातून आम्हाला जायचं होतं, त्याच्यामध्ये कुठलीही हवामानाची समस्या नव्हती. याबाबत आम्ही जेव्हा इंडिगो कर्मचाऱ्यांबरोबर चौकशी केली. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, वेबसाइटवर अपडेट केलं नाहीये. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं होतं आणि सतत खोटं बोलतं होते. त्यांनी आम्हाला एकदा पण सत्य परिस्थितीत सांगितली होती. आमच्या विमानाने रात्री उशीरा उड्डाण केलं. हे उड्डाण नियोजित वेळापत्रकाच्या सुमारे १० तास उशीर होतं. आम्ही विमानतळावर १० तास कसे घालवले….त्या भयानक आठवणी शब्दात मांडणं खूप कठीण आहे. इंडिगोच्या या वर्तणुकीबाबत आणि ज्या आम्ही कठीण परिस्थितीतून गेलो त्याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे.”

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मालिका झाली ऑफ एअर, प्रेक्षक म्हणाले, “मालिका थांबली याचं दुःख आहे…”

दरम्यान, याआधी अभिनेत्री राधिका आपटेने मुंबई विमानतळावर आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. गर्दीचे व त्रस्त प्रवाशांचे व्हिडीओ शेअर करत राधिकाने विमानतळाच्या व्यवस्थेवर संतप्त पोस्ट लिहिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranvir shorey angry on indigo flight delayed 10 hours he will be complaint file pps
Show comments