आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबरोबर एखादा फोटो मिळावा, असं त्यांच्या चाहत्यांना वाटत असतं. विमानतळ किंवा सार्वजनिक ठिकाणी हे सेलिब्रिटी येतात तेव्हा त्यांच्याबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी चाहते गर्दी करतात. एका बॉलीवूड अभिनेत्याने विमानतळावरील व्हिडीओ शेअर केला आहे. तो चाहता सेल्फी काढायला आला, पण त्याने जे केलं ते पाहून नेटकरी हसत आहेत.

नुकताच ‘बिग बॉस ओटीटी ३’ व ‘शेखर होम’ मध्ये झळकलेला अभिनेता रणवीर शौरीने त्याच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने “आज कोलकाता विमानतळावर हे घडलं,” असं कॅप्शन दिलं आहे. रणवीरने कॅप्शनमध्ये रडणारा इमोजी टाकला आहे, पण चाहते मात्र हा व्हिडीओ पाहून खूप हसत आहेत.

८०० कोटींचा पतौडी पॅलेस रंगवण्याऐवजी सैफ अली खानने लावला चुना; सोहा अली खान म्हणाली, “आजोबांचे पैसे…”

व्हिडीओमध्ये दिसतंय की रणवीर विमानतळावर रांगेत उभा आहे. अचानक एक तरुण तिथे येतो आणि त्याला म्हणतो “सर मी एक सेल्फी घेऊ शकतो का?” रणवीरला वाटतं की तो त्याचा चाहता आहे, तर तो त्याला हातवारे करून हो म्हणतो आणि टी शर्ट नीट करून पोज द्यायला जातो. पण तो चाहता रणवीरसमोर उभा राहून फक्त त्याचा एकट्याचाच सेल्फी घेतो आणि निघून जातो.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

पाहा व्हिडीओ –

रणवीर शौरीने हा व्हिडीओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर काही जण हसत आहेत, तर काही नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. ‘सेल्फी चांगला होता का?’, ‘अशा लोकांपासून दूर राहा,’ ‘त्याने जे म्हटलं तेच केलं स्वतःचा सेल्फी घेतला,’ ‘त्याने तुझा बिग बॉस ओटीटी ३ मधील एपिसोड पाहिला असेल’ अशा कमेंट्स यावर नेटकरी करत आहेत.

“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

रणवीर शौरीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याची ‘शेखर होम’ नावाची सीरिज नुकतीच जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात केके मेनन, रसिका दुग्गल, किर्ती कुल्हारी व शेरनाज पटेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच रणवीर ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभागी झाला होता. या शोचा तो पहिला रनर अप होता.

Story img Loader