अभिनेता रितेश देशमुख हा कायमच सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही महिन्ंयाभरापूर्वी प्रदर्शित झालेला त्याचा ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिवस चांगली कमाई केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. आता रितेश देशमुख हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करताना दिसतात. इन्स्टाग्रामवरही त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नीच्या कटकट करण्याबद्दल बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर
“जर तुमची पत्नी तुमच्याबरोबर जास्त कटकट करत असेल, तर चप्पल उचला आणि ती घालून सरळ बाहेर जा. त्यापलीकडे जास्त काही विचारही करु नका… नाहीतर नको ते होऊन बसेल”, असे या व्हिडीओत रितेश बोलताना दिसत आहे.
रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र”, असे रितेश कॅप्शन देताना म्हणाला आहे.
आणखी वाचा : Video : …अन् पुरस्कार मिळाल्यानंतर रितेश देशमुख जिनिलीयाच्या पडला पाया
रितेशच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तर एकाने ‘डरपोक माणूस’ अशी कमेंट केली आहे. तर काहींनी ‘Hahahaha’ असे कमेंट करताना लिहिले आहे.