बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते कायमच सक्रिय असतात. मजेशीर रील्सच्या माध्यमातून ते कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. रितेशने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. पोस्टरवरून हा चित्रपट प्रेम कहाणी आणि थ्रिलर या पठडीतला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत दिसणार असून रितेश याचं दिग्दर्शन करणार आहे. रितेश जिनिलिया अनेक वर्षानंतर चित्रपटात काम करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कर्ली टेल्स या कार्यक्रमाला मुलखात दिली होती. यात त्यांनी एकमेकांच्या आवडीनिवडी सांगितल्या आहेत. या कार्यक्रमात रितेशला जिनिलियाबद्दल एक प्रश्न विचारला तो असा होता की ‘जिनिलियाला सध्या कोणता पदार्थ जास्त आवडत आहे’? रितेशने लगेच उत्तर दिले ‘खाकरा’, त्याच्या या उत्तरावर जिनिलियानेदेखील मान डोलवली.

ऋषी सुनक यांच्यावर बायोपिक येणार? ‘या’ अभिनेत्यांची नावं चर्चेत!

खाकरा हा मूळ गुजराती पदार्थ आहे. आज बाजारात अनेक खाकऱ्याचे पदार्थ उपलब्ध आहेत. या कार्यक्रमात दोघांनी आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीदेखील सांगितल्या आहेत. त्यांच्या घरी पारंपरिक मराठी पदार्थ बनतात. जिनिलियाला मिरचीचा ठेचा आवडतो. गेले काही महिने ते आता पूर्णपणे शाकाहारी झाले आहेत. तसेच त्यांनी एका खाद्यपदार्थाचा ब्रँडदेखील सुरु केला आहे.

‘तुझे मेरी कसम’ या हिंदी चित्रपटात ते पहिल्यन्दा एकत्र दिसले होते. यानंतर दोघांनी मस्ती, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटात काम केले होते. दोघांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली त्यांनी लग्न केले. आज त्यांना दोन मुले आहेत. रितेशने ‘लई भारी’ चित्रपटातून मराठीत पदार्पण केले. या चित्रपटात दोघे एका गाण्यात दिसले होते.

Story img Loader