बॉलिवूडचा नवाब म्हणजे सैफ अली खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील सैफच्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बरी कमाई केली. अगदीच सुपरहीट ठरला नसला तरी या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. सैफ अली खान हा क्रिकेटर टायगर पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा सर्वात मोठा मुलगा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच शर्मिला टागोर यांनी ‘इंडियन आयडल १३’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या या विशेष भागात शर्मिला टागोर यांच्या आजवरच्या फिल्मी करकीर्दीवर प्रकाश टाकण्यात आला आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमात शर्मिला यांच्या मुलांनी म्हणजेच सैफ, सोहा यांनी त्यांच्यासाठी खास मेसेज रेकॉर्ड करून पाठवला होता. याबरोबरच करीनानेही त्यांच्यासाठी खास मेसेज पाठवला होता. या कार्यक्रमातले काही खास क्षण सैफची धाकटी बहीण सबा पतौडीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आणखी वाचा : ओटीटीवर रिलीजसाठी ‘ब्रह्मास्त्र’ सज्ज; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट

या कार्यक्रमात आपल्या आईबद्दल मनोगत व्यक्त करताना सैफ भावूक झाला. त्याने दिलेल्या मेसेजमध्ये तो म्हणाला, “मला तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे हे आज जगाला सांगायला मला खूप अभिमान वातो आहे. तू आज चित्रपटसृष्टीतील ६० वर्षं पूर्ण केली आहेस. तू जेव्हा चित्रपटात काम करत होतीस तेव्हा तू कधीच आपल्या घराकडे दुर्लक्ष केलं नाहीस. काम आणि कुटुंब यात तू योग्य समतोल साधलास.”

पुढे सैफ म्हणाला की, “आमच्या जन्मानंतरही तू चित्रपटात काम केलंस आणि ‘अमर प्रेम’. ‘आराधना’, ‘चुपके-चुपके’सारखे सुपरहीट चित्रपट दिलेस. काम करणाऱ्या महिलेला कसा आदर द्यायचा हे आम्ही तुझ्याकडून शिकलो. यामुळेच मी आज घरी बसून तैमुरची देखभाल करत आहे आणि करीना चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहे.” सैफने दिलेली एवढी उत्स्फूर्त दाद आणि कुटुंबीयांच्या सदिच्छा ऐकून शर्मिला भावूक झाल्या.