सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी नेहमी चर्चेत असतात. इब्राहिम आणि पलक एकत्र सतत हॉटेल किंवा चित्रपटगृहाबाहेर दिसतात. त्यामुळे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहेत. अफेअरच्या चर्चेदरम्यान इब्राहिम आणि पलकचा आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवं वर्ष साजरं करण्याच्यानिमित्ताने इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकत्र होते. याचवेळी पापाराझींनी दोघांना स्पॉट केलं. सेलिब्रिटी फोटोग्राफ ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर इब्राहिम आणि पलकचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, दोघं मागच्या सीटवर बसलेले पाहायला मिळत आहेत. जेव्हा ते स्पॉट होतात, तेव्हा इब्राहिम तोंड लपवताना दिसत आहे. तर पलक मोबाइलमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – John Abraham Bungalow: जॉन अब्राहमने मुंबईत खरेदी केला आलिशान बंगला, किंमत वाचून व्हाल हैराण

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “पुढची पिढी. ही पतौडी मालमत्तेची मालकीन असेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “पलक तिवारी ही दुसरी अमृता सिंह आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “पलकला कदाचित माहित नसेल सैफची मालमत्ता इब्राहिमला मिळणार नाहीये.” अशा अनेक प्रतिक्रिया इब्राहिम आणि पलकच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “मालकीणबाई…”, हेमंत ढोमेने बायको क्षिती जोगला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला, “आपल्या लाईफची…”

दरम्यान, पलक तिवारीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती गेल्या वर्षी २०२३, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण पलकचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र या चित्रपटातील तिचा अभिनय अनेकांच्या चांगलाच पसंतीस पडला. इब्राहिमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो करण जोहरला असिस्ट करत आहे. लवकरच इब्राहिम खुशी कपूरबरोबर मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे, अशी काही दिवसांपूर्वी बातमी आली होती.