बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यातच आता सलमान खानने त्याच्या चाहत्यांना एक फोटो पोस्ट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण हा फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सलमान खान हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सलमानने ट्विटरवर एक ट्वीट करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबर त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोत सलमान खानबरोबर अभिनेता आमिर खान पाहायला मिळत आहे. त्या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
आणखी वाचा : Video : काजोल आणि अजयची लेक निसाचं वय नेमकं किती? वाढदिवसाचा केक पाहून नेटकरी म्हणाले “ती २५-२६ वर्षांची…”
सलमानच्या घरी ईदची दावत खाण्यासाठी आमिर खानने हजेरी लावली होती. यावेळीचा एक छान फोटो त्याने पोस्ट केला. यावेळी सलमानने काळ्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. तर आमिरने निळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहे. या फोटो त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट पाहायला मिळत आहे.
सलमानने २१ एप्रिल रोजी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन देताना त्याने ‘चांद मुबारक’ असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.