Salman Khan Dance On Kombadi Palali Song : बॉलीवूडचा भाईजान सध्या खूप चर्चेत आहे. एकीकडे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अशातच सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये तो ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानचा डान्स व्हिडीओ त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘सारेगमप चॅलेंज २००९’चा आहे. ‘सारेगमप चॅलेंज २००९’ हा सीझन मराठमोळी गायिका वैशाली माडे जिंकली होती. या कार्यक्रमात एकेदिवशी सलमान खान आणि कतरिना कैफ पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तेव्हा त्याने ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर डान्स केला होता.

हेही वाचा – Video: १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या सेटवर कलाकारांचा जल्लोष, नितीश चव्हाणने केला भन्नाट डान्स

या व्हिडीओमध्ये सलमान खान वैशाली माडेला एखादं मराठी गाणं गा, असं सांगताना दिसत आहे. तेव्हा वैशाली ‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ गाणं गाते. यावर सलमान खान मस्त डान्स करताना दिसत आहे. तो ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर इतका नाचतो की सर्वजण अवाक होतात. तसंच कतरिना कैफ हसायला लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. वैशाली माडेने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हार्टचं इमोजी प्रतिक्रियेत दिला आहे.

सलमान खानच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “महाराष्ट्राचा मराठी माणसू सलमान”, “कडक सलमान खान”, “भारी नाचला”, “काय डान्स केला”, “सलमानला जमलं”, “सलमानचा गावठी डान्स मस्त”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – “प्रिय आशुआई…”, अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथी निमित्ताने सूनबाईची भावुक पोस्ट, म्हणाली, “आजचा दिवस…”

दरम्यान, ‘सारेगमप चॅलेंज २००९’ हे सीझन खूप गाजलं होतं. या सीझनला हिमेश रेशमिया, शंकर महादेवन, प्रीतम हे परीक्षक म्हणून होते. वैशाली माडेसह यशिता यशपाल शर्मा, शौमेन नंदी हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. पण वैशाली माडेने तिच्या सुमधूर आवाजाने ‘सारेगमप चॅलेंज २००९’च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor salman khan dance on kombadi palali song sung by vaishali made old video viral softnews pps