बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या मागे बॅकग्राउंड डान्सरसारखा डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी सलमानवर निशाणा साधला आहे. पैसा असेल तर काहीही होऊ शकते असे म्हणत अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा- गीगी हदीदच्या कमरेवर बोनी कपूर यांनी ठेवला हात; फोटो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “काका…”

Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
remo dsouza attend mahakumbh mela
Video : जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर चेहरा लपवून महाकुंभमेळ्याला पोहोचला अन्…; बॉलीवूड कोरिओग्राफरचा व्हिडीओ व्हायरल
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत

हा व्हिडिओ पाच वर्ष जूना म्हणजे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमाचा आहे. यामध्ये सलमान खान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत अनंत अंबानी पुढे नाचत आहे तर सलमान मागे नाचताना दिसत आहे. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी सलमानवर निशाणा साधत त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

व्हिडिओमध्ये सलमान आणि अनंत व्यतिरिक्त इतर अनेक लोक स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई मिल गया’ गाण्यावर प्रत्येकजण नाचताना दिसत आहे. आधी अनंत गिटार वाजवतो, यावेळी सलमान सगळ्यांसोबत मागे दिसतोय. मग ते गुडघ्यावर बसून नाचू लागतात. नंतर गिटार स्टेप संपल्यानंतर सगळे एकत्र नाचताना दिसतात.

अनेक लोक सलमानच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “ही पैशाची ताकद आहे. तुम्ही कोणालाही तुमच्या तालावर नाचवू शकता.” ऋषभ नावाच्या युजरने लिहिले, “पैसा नकली तमाशा देख. तुम्ही पैसे दिले तर तो तुमच्या मागे उभा राहून नाचतो. काही युजर्स मात्र सलमानचा बचाव करताना दिसले. मिनी नावाच्या युजरने लिहिले, “तुला वाईट का वाटत आहे? ते फक्त तेच करत आहेत जे करुन पैसे कमवता येतात.

सलमानच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेली कमेंट

सलमान आणि शाहरुखची तुलना

अलीकडेच अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खान स्टेजवर डान्स करताना दिसला. सलमानची तुलना आता शाहरुखच्या या व्हिडिओशीही केली जात आहे. रशीद एसआरके नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने दोन्ही व्हिडिओ शेअर केले आणि लिहिले, “मेगा स्टार शाहरुख खान पार्टीत मुख्य माणूस आहे आणि पार्टीमध्ये वरुण आणि रणवीरसोबत राजासारखा नाचत आहे. अंबानींच्या पार्टीत सलमान खान बॅकग्राऊंड डान्सर बनला आहे. हाच फरक आहे.”

Story img Loader