बॉलीवूडचे तीन खान गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यामुळे चर्चेत आहेत. या सोहळ्यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान एकत्र ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर थिरकताना दिसले. तसेच अ‍ॅकॉनच्या ‘छम्मक छल्लो’वर देखील शाहरुख, सलमानचा डान्स पाहायला मिळाला. त्यामुळे सध्या बॉलीवूडच्या या तीन खानची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच सलमान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भाईजान चाहत्यावर भडकलेला पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानचा हा व्हायरल व्हिडीओ त्याचं चाहत्याने शेअर केला आहे, ज्यावर अभिनेता भडकला होता. अमोल बिलारी असं या चाहत्याने नाव आहे. त्याने सलमानचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमानला पाहताच हा चाहता सेल्फी व्हिडीओ करू लागतो. पण भाईजानच्या हे लक्षात येताच तो चाहत्यावर भडकतो. “तुझा फोन बंद कर, मी म्हटलं ना फोन बंद कर. हा व्हिडीओ डिलीट कर,” असं चाहत्याला सुनावताना सलमान खान दिसत आहे. त्यानंतर चाहता सॉरी बोलून व्हिडीओ बंद करतो.

हेही वाचा – Video: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

सलमान खानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याला ट्रोल केलंय, तर काही जणांनी त्याला समर्थन दर्शवलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘सलमान खान म्हातारा दिसतो म्हणून तो हा व्हिडिओ व्हायरल करायला घाबरला.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘ठीक आहे. बॉलीवूड अभिनेत्यांना व अभिनेत्रींना फॉलो करणं बंद करा.’ तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘सलमान किती गर्विष्ट आहे.’

हेही वाचा – Video: अंबानींची धाकटी सून शाहरुख खानला म्हणाली ‘अंकल’, बादशहाने अक्षय कुमारचं नाव घेत दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘टायगर वर्सेज पठाण’, ‘किक २’ आणि ‘दबंग ४’ यांसारख्या आगामी चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे. त्यामुळे भाईजानचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor salman khan gets angry on fan while taking selfie video pps