अभिनेता सलमान खानने आता ५९व्या वयात पदार्पण केलं आहे. २७ डिसेंबरला सलमानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यादिवशी मुंबईत भाईजानने आपल्या कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या वाढदिवशी भाची आयतचा वाढदिवस असतो. त्यामुळे सलमान २७ डिसेंबरला आयतबरोबर केक कापताना दिसला. याचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर खान कुटुंबासह अनेक सेलिब्रिटी सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जामनगरला रवाना झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील सर्वात मोठे उद्योगपतींपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाने सलमान खानच्या ५९व्या वाढदिवसाची पार्टी जामनगरमध्ये आयोजित केली होती. सलमानचा वाढदिवस अंबानी कुटुंबाने मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. स्वतः मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या पार्टीला उपस्थित होते. जामनगरमधील पार्टीतला एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “प्राजक्ता ताई आम्ही तुझ्याबरोबर, ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको”, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “कलाकाराचं दुःख…”

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते अतुल अग्निहोत्री यांनी सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये भाईजान भाची आयतसह केक कापताना दिसत आहे. यावेळी एकाबाजूला खान कुटुंबासह इतर सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी टाळ्या वाजवत सलमानला शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे. जामनगरमध्ये सलमान खानच्या वाढदिवसाची पार्टी जल्लोषात झाली आहे. या पार्टीला खान कुटुंबासह अभिनेता रितेश देशमुख, जिनिलीया डिसूजा-देशमुख, निर्माता साजिद नाडियाडवाला जामनगरमध्ये पाहायला मिळाले.

हेही वाचा – प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ उतरले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक, पोस्ट करत म्हणाले, “ज्या समाजात महिलांचा सन्मान…”

हेही वाचा – फोटोतील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्यांना ओळखलंत का? लवकरच दोघांचा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ची चर्चा आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून २८ डिसेंबरला या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. ‘सिकंदर’ चित्रपटाचं दिग्दर्शन एआर मुरुगादॉस करत आहेत. या चित्रपटात सलमान खानसह रश्मिका मंदाना, सुनील शेट्टी आणि काजल अग्रवाल प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor salman khan jamnagar birthday party video goes viral pps