बॉलीवूडचा भाईजान सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण आता दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होताना दिसत आहे. अशातच सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो एका महिलेला किस करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच सलमान खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (IFFI 2023) सहभागी झाला होता. यावेळी सलमानला पाहताच लोकांची मोठी गर्दी झाली होती. अभिनेता या फेस्टिव्हलमध्ये भाची अलिजेह अग्निहोत्रीसाठी पोहोचला होता. अलिजेह ‘फर्रे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी IFFI 2023साठी निवडण्यात आला होता. त्यामुळे सलमान आपल्या भाचीला प्रोत्साहन देण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहिला होता. यादरम्यानचा सलमानचा एका महिलेला किस करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – “माझे डोळे सतत भरून येत होते…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातला सांगितला अनुभव, म्हणाला…

‘इन्स्टंट बॉलीवूड’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर सलमान खानचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान गर्दीतून एका महिलेकडे जातो आणि हसत-हसत तिच्या कपाळावर किस करता दिसत आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये अधिराजच्या आईच्या भूमिकेत झळकली ‘ही’ अभिनेत्री; याआधी गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

ती महिला कोण आहे?

अभिनेता सलमान खान ज्या महिलेला कपाळावर किस करताना दिसत आहे, त्या एक वरिष्ठ पत्रकार आहेत. सलमान आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor salman khan kissing woman at iffi 2023 video goes viral on social media pps