बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान एका अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. पत्रकार परिषदेत दबंग खान मनमोकळेपणाने बोलला. बॉक्स ऑफिसवर चित्रपट सतत फ्लॉप का होतात यामागचे कारणही सलमाने उघडपणे सांगितले आहे.

हेही वाचा- Video : रविना टंडनच्या मुलीला विमानतळावर धक्काबुक्की; नाराजी व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

चित्रपट का फ्लॉप होतात?

अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत फ्लॉप हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, ‘आजकाल चुकीचे चित्रपट बनवले जात आहेत. त्यामुळेच ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. चित्रपट निर्मात्यांना वाटते की ते उत्तम चित्रपट बनवत आहेत, पण तसे नाही.हिंदी चित्रपट चालत नाहीत, हे मी खूप दिवसांपासून ऐकत आहे. वाईट चित्रपट बनवले तर कसे चालतील? प्रत्येकाला वाटते आपण ‘मुगल-ए-आझम’, ‘शोले’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया’ सारखे सुपरहिट चित्रपट बनवत आहोत. पण तसं नाहीये. कारण आजकाल असे काही दिग्दर्शक आहेत ज्यांना भारत फक्त कुलाबा ते अंधेरपर्यंतच असल्यासारखा वाटतो. पण तो भारत नाहीये. भारत हा रेल्वेस्टेशनच्या पलीकडून सुरु होतो. आजच्या दिग्दर्शकांना वाटते की ते मस्त पिक्चर काढतील. पण असे होताना दिसत नाही. असेही सलमान म्हणाला.

यावेळी सलमान खानने त्याच्या आगामी ‘किसी का भाई की जान’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. सलमान म्हणाला ‘हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. तुम्ही सगळे चित्रपट बघायला जा. मोठ्या मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. ही क्लिप विसरू नका, नाहीतर नंतर तुम्ही म्हणाल तुम्ही किती बोलत होता आणि तुम्ही स्वतः कोणत्या प्रकारचा चित्रपट बनवला आहे. सलमानचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक जोरजोरात हसायला लागले.

हेही वाचा- “पप्पांना तुझा अभिमान वाटेल असं…” भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट, फोटोंनी वेधलं लक्ष

सलामानचा आगामी चित्रपट

सलमानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम आणि जस्सी गिलसारखे स्टार्स देखील आहेत. सलमान खान आणि पूजा हेगडे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलमानचा ‘टायगर ३’ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader