बॉलीवूड अभिनेता सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचलेल्या सलमानला कपिल शर्माने अनेक मजेशीर प्रश्न विचारले. सलमानने त्याला जान संबोधण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे याबाबतही खुलासा केला आहे.

हेही वाचा- सलमान खानला डेट करण्याच्या चर्चांवर पूजा हेगडेने सोडलं मौन; म्हणाली…

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद

कपिल शर्माने सलमानला विचारले की, सगळे तुला भाऊ म्हणतात. पण ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस? याला उत्तर देताना सलमान म्हणाला, “आयुष्यात ‘जान’ म्हणण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका. ‘जान जान’ म्हणत त्या तुमचा जीव घेतात. ‘तुझ्यासोबत राहून मला खूप आनंद झाला. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’ मग थोडा वेळ जातो आणि त्यानंतर ‘आय लव्ह यू’ म्हटलं जातं आणि या ‘आय लव्ह यू’नंतर मुलगा फसला हे कळताच तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समज,” असे मजेशीर उत्तर सलमानने दिले आहे.

हे ऐकून कपिल शर्मा आणि अर्चना पूरण सिंगसह सगळेच हसले. सलमान इथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, “जान हा अपूर्ण शब्द आहे. पूर्ण वाक्य बहुधा असे असेल की, मी तुझा जीव घेईन. त्यानंतर मी दुसर्‍याला ‘जान’ बनवेन आणि त्याचाही जीव घेईन.”

हेही वाचा- चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक करणार होते आत्महत्या पण… शबाना आजमींनी केला खुलासा

दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या फरहाद सामजी दिग्दर्शित चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader