बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आपल्या स्टाईलमुळे ओळखला जातो. चित्रपटाच्या व्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमान खानचे कुटुंब बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित कुटुंब मानले जाते. सलमान खानची आई मराठी असल्याने सलमानला मराठी विषयी विशेष प्रेम आहे. सलमानची आई सलमा खान यांचा नुकताच वाढदिवस होऊन गेला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सलमा यांच्या वाढदिवसाची पार्टी त्यांची मुलगी अल्विरा आणि अतुल अग्निहोत्री यांनी ठेवली होती. गायिका हर्षदीप कौर हिच्या गाण्याच्या कार्यक्रम पार्टीत ठेवला होता. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात अभिनेत्री हेलन ठेका धरताना दिसत आहेत. तसेच पार्टीत विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
सलमा यांचे पूर्वाश्रमीचे नाव सुशीला चरक, त्या मूळच्या मुंबईच्या असून त्यांनी १९६४ साली लेखक सलीम खान यांच्याशी लग्न केले. त्यांना सलमान, अरबाज, सोहेल अशी तीन मुले आहेत. सलीम खान यांनी १९८१ साली अभिनेत्री हेलन यांच्याशी लग्न केले. खान कुटुंबीय एकत्र असून ते एकाच इमारतीत मुंबईत राहतात.