अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकार, त्यांचे डायलॉग, गाणी सर्व काही सुपरहिट ठरलं. त्यामुळे आता ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’मध्ये एक बॉलीवूड सुपरस्टार झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या वर्षभरापासून ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाविषयी नवनवीन अपडेट येत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयीची अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात वर्णी लागल्याचं म्हटलं जात होतं. पण अभिनेत्याने हे फेटाळलं आणि या अफवा असल्याचं सांगितलं. आता एक बॉलीवूड सुपरस्टार ‘पुष्पा २: द रुल’मध्ये पाहायला मिळणार असल्याचं वृत्त आलं आहे.

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

हेही वाचा – “मला पटवण्यापुरतं त्यानं…”, उदय टिकेकर व आरती अंकलीकर यांची ‘अशी’ झाली भेट, गायिका म्हणाल्या…

‘पुष्पा २: द रुल’मध्ये झळकणारा हा बॉलीवूड सुपरस्टार याआधीही दाक्षिणात्य चित्रपटात झळकला होता. त्याच्या दाक्षिणात्य चित्रपटातील भूमिका हिट झाल्या होत्या. हा बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणजे संजय दत्त. सियासत डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटात संजय दत्तची वर्णी लागली आहे. माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटात संजय दत्तचा कॅमिओ असणार आहे. पण याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: मुक्ता-सागरचा रोमान्स सुरू असतानाच घरच्यांची एन्ट्री अन् मग…; नेमकं काय घडणार? जाणून घ्या…

दरम्यान, येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘पुष्पा २’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

Story img Loader