बॉलीवूड अभिनेता संजय दत्त नेहमी कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतो. अभिनयासोबतच संजूबाबाने अनेक व्यवसायांत स्वत:ला आजमावले आहे. त्याने अलीकडेच एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ही मद्य क्षेत्रातील ब्रँड कंपनी आहे. त्यानंतर आता संजय दत्तने क्रिकेट क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे. ‘एरीज ग्रुप ऑफ कंपनीज’चे संस्थापक, अध्यक्ष व सीईओ सोहन रॉय यांच्यासह संजय ‘हरिकेन्स’ संघाचा सहमालक बनला आहे. क्रिकेटच्या जगात संजय दत्तची ही पहिली व्यावसायिक गुंतवणूक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘जवान’चं जपान कनेक्शन ते दिग्दर्शक अ‍ॅटलीचं मानधन; शाहरुखच्या आगामी चित्रपटाबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

झिम्बाब्वे जिम आफ्रो ‘टी१०’ स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीत आहे. ही स्पर्धा २० जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची ‘हरिकेन्स’ टीमही खेळणार आहे. क्रिकेटची ही ‘टी१०’ स्पर्धा झिम्बाब्वेमधील हरारे येथे होणार आहे. ही स्पर्धा २० जुलैला सुरू होऊन २९ जुलै रोजी संपेल.

संजय दत्तने अलीकडेच अल्कोबेव्ह स्टार्टअप कार्टेल आणि ब्रदर्समध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीची रक्कम किती आहे हे अद्याप कळू शकलेले नसले तरी हा करार कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- ‘आदिपुरुष’ला स्पेशल ऑफरचाही फायदा नाहीच! सातव्या दिवसाची आकडेवारी पाहून बसेल धक्का

चित्रपटांसोबतच संजय दत्त त्याच्या लक्झरी लाइफबद्दलही खूप चर्चेत असतो. त्याने इंडस्ट्रीत प्रसिद्धीबरोबर पैसाही कमवला आहे. संजय दत्त करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. संजयला वाहनांचीही खूप आवड आहे. त्याच्या गाड्यांची किंमत करोडो रुपये आहे. २०२२ पर्यंत त्याची एकूण संपत्ती १३७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्यानंतर त्याच्या संपत्तीत आणखी भर पडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor sanjay dutt bought harare hurricanes cricket team in zimbabwe s zim afro t10 tournament dpj