अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाचा २००० साली ‘हेराफेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून सध्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या भागात बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात संजय दत्तदेखील दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय दत्तने आजवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. कॅन्सरसारख्या रोगावर मात करून तो आता पुन्हा एकदा कामाला लागला आहे. डाऊनटाऊन या दुकानाच्या उदघाटनानिमित्त आला असताना त्याला ‘हेराफेरी’ चित्रपटाबद्दल विचारले असता तो असं म्हणाला, “हो मी हा चित्रपट करत आहे. या टीमबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. ही एक उत्तम फ्रँचायझी आहे आणि मला आनंद होत आहे की मी याचा भाग आहे, फिरोझ आणि माझे संबंध खूप जुने आहेत. तसेच अक्षय कुमार, सुनील अण्णा, परेश रावल यांच्याबरोबर एकत्र असणं खूप छान असतं.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

“तो काळ वाईट…” दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या चित्रपटाचा उल्लेख करत रणबीर कपूरने व्यक्त केली खंत

काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. शिवाय मध्यंतरी यात अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन यात दिसणार असल्याच्या बातमीमुळेही चाहते चांगलेच नाराज झाले होते.

संजय दत्त या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार असे बोलले जात आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “संजय दत्तने विनोदी भूमिकादेखील उत्तमरित्या निभावल्या आहेत. ‘हेरा फेरी’ युनिव्हर्समध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आणि धमाल आणण्यासाठी निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय खूप योग्य आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor sanjay dutt confirm that he will be seen in hera pheri 3 film spg