देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Wedding) अखेर लग्नबंधनात अडकला आहे. १२ जुलैला रात्री अनंतने राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधली. अनंत-राधिकाचा मोठ्या थाटामाटात शाही लग्नसोहळा पार पडला. या शाही लग्नसोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, रणवीर कपूर, रणबीर सिंह, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख अशा अनेक कलाकारांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास उपस्थिती लावली होती. बॉलीवूडचे हे कलाकार अनंत अंबानीच्या वरातीत जबरदस्त नाचताना पाहायला मिळाले. वरातीमधील शाहरुख खान व सलमान खानही एकत्र डान्स (Shah Rukh Khan and Salman Khan Dance) करताना दिसले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा ग्रँड लग्नसोहळा सुरू आहे. २९ डिसेंबर २०२३ला अनंत-राधिकाचा राजस्थानमध्ये साखरपुडा झाला. राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर १८-१९ जानेवारी २०२४ला राधिकाचा मेहेंदी सोहळा झाला. यावेळी गोल धना एंगेजमेंट पार्टी आयोजित केली होती; ज्याला बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मग एका महिन्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये झाला. या प्री-वेडिंग सोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती.

Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत
Sambhaji Raje Chhatrapati on Chhaava Trailer Dance
Chhaava Trailer: ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखविल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे संतापले
Lakhat Ek Amcha Dada fame komal more atul kudale Kalyani choudhary dance on dada kondke song
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा दादा कोंडकेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Rakesh Roshan on karan arjun movie
Rakesh Roshan: शाहरुख-सलमान करण अर्जुन चित्रपट अर्ध्यातच सोडणार होते; पण चित्रपट हिट ठरल्यानंतर शाहरुखने थेट…

हेही वाचा – Video: अजय-अतुल, श्रेया घोषलचा लाईव्ह परफॉर्मन्स अन् राधिका मर्चंटची सुंदर रथातून मंडपात ग्रँड एन्ट्री; तर अनंत अंबानी…

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर १८ मे ते १ जूनपर्यंत दुसरं प्री-वेडिंग आलिशान क्रूझवर करण्यात आलं. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग झालं. त्यानंतर जुलै महिना सुरू होताच सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ, गरबा नाईट्स, संगीत समारंभ, ग्रह शक्ती पूजा, शिव शक्ती पूजा, हळदी, मेहंदी असे कार्यक्रम पार पडले. अखेर १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकले.

लग्नाआधी अनंत अंबानीची मोठी वरात पाहायला मिळाली. या वरातीमध्ये डीजेसह लोकप्रिय गायकांचे लाइव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आले होते. यावेळी वरातीत डीजेवर ‘करण-अर्जुन’ चित्रपटातील ‘भंगडा पाले आजा आजा’ गाणं लावण्यात आलं. त्यावर करण-अर्जुन म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान डान्स करताना पाहायला मिळाले. त्यांच्याबरोबर नीता अंबानी देखील थिरकताना दिसल्या. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात केला भांगडा; लग्न लागताच पत्नी राधिकासह केला ‘अशाप्रकारे’ आनंद व्यक्त

Shah Rukh Khan And Salman Khan Dance
शाहरुख खान आणि सलमान खान डान्स (Photo Credit – Manav Manglani Instagram)

पाहा शाहरुख-सलमान खानचा हातात हात घालून डान्स

हेही वाचा – Anant-Radhika Wedding: सोन्याचे वर्क असलेल्या अनंत अंबानीच्या स्नीकर्सने वेधलं लक्ष, ‘इतकी’ आहे विदेशी शूजची किंमत

दरम्यान, अनंत अंबानी-राधिकाच्या मर्चंटच्या लग्नसोहळ्यानंतर आज १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader