देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Wedding) अखेर लग्नबंधनात अडकला आहे. १२ जुलैला रात्री अनंतने राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधली. अनंत-राधिकाचा मोठ्या थाटामाटात शाही लग्नसोहळा पार पडला. या शाही लग्नसोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, रणवीर कपूर, रणबीर सिंह, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख अशा अनेक कलाकारांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास उपस्थिती लावली होती. बॉलीवूडचे हे कलाकार अनंत अंबानीच्या वरातीत जबरदस्त नाचताना पाहायला मिळाले. वरातीमधील शाहरुख खान व सलमान खानही एकत्र डान्स (Shah Rukh Khan and Salman Khan Dance) करताना दिसले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा