Shahrukh Khan And Suhana Khan Viral Video: २०२३मध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने बॉलीवूड क्षेत्रात पाऊल ठेवलं. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून सुहानाने पदार्पण केलं. त्यानंतर आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, आर्यन अभिनयाच्या माध्यमातून नव्हे तर दिग्दर्शनातून पदार्पण करत आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून आर्यन खूप चर्चेत होता. आता आर्यनच्या नव्या प्रोजेक्टची स्वतः शाहरुख खानने घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच ‘नेटफ्लिक्स’ने आर्यन खानच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आर्यनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः शाहरुख खान, गौरी खान आणि सुहाना खानने खास उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुख खानने आर्यनच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगितलं. तसंच मुलाने घेतलेल्या मेहनतीविषयी बोलला. याचं कार्यक्रमातील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये शाहरुख खानचं मुलीवर असलेलं प्रेम पाहायला मिळत आहे.

शाहरुख खान आणि सुहाना खानचा हा व्हिडीओ ‘दिनेश राजक’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख खान आपल्या कुटुंबियांबरोबर पापाराझींना पोज देताना दिसत आहे. याचवेळी सुहाना आर्यनच्या बाजूला उभी राहण्यासाठी पुढे येते. तेव्हा शाहरुख सुहानाचे कपडे नीट करताना दिसत आहे. किंग खानच्या याचं कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे.

शाहरुख आणि सुहाना खानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप काळजी घेणारा वडील आहे. त्यामुळेच त्याला किंग म्हणतात.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, कितीही स्टार असला तरी तो वडिलांपेक्षा मोठा असू शकत नाही.

दरम्यान, आर्यन खान ‘The Ba***ds Of Bollywood’ या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. ही सीरिज लवकरच ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये कोण-कोणते कलाकार पाहायला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.