बॉलीवूडच्या किंग खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळतं आहे. ‘पठान’च्या यशानंतर ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतोय? हे येत्या काळात समजेल. तत्पूर्वी आज शाहरुख आपल्या चाहत्यांबरोबर गप्पा मारण्यासाठी ट्वीटवर हजर झाला होता. ‘आस्क एसआरके’ सेशनमधून त्यानं पुन्हा एकदा चाहत्यांशी संवाद साधला.
हेही वाचा – सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेला फ्लॅट ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला विकत? तीन वर्षांपासून होता बंद
शाहरुखला ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये सनी देओच्या ‘गदर २’पासून ते सलमान खानचा नव्या लूकपर्यंतचे असंख्य प्रश्न विचारण्यात आले. याचवेळी शाहरुखने ‘जवान’ चित्रपटातील नवं गाणं ‘रमैया वस्तवैया’चा टीझर प्रदर्शित केला.
एका चाहत्यानं शाहरुखला विचारलं की, ‘आतापर्यंत तू मणिरत्न, एटली, विजय सेतुपति यांच्याबरोबर काम केलं आहे. तुला या दाक्षिणात्य सुपरस्टार्सबरोबर काम करू कसं वाटलं?’ यावर बादशाह म्हणाला की, “खरंतर सगळेच जबरदस्त आहेत. सर्वजण निष्ठेने काम करतात. शिवाय त्यांचं जेवणही खूप चविष्ट असतं.”
हेही वाचा – सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “शेवटी सर्वांना…”
तसेच दुसऱ्या चाहत्यानं विचारलं की, ‘सलमानने नुकताच बदलेल्या लूकमधून तो ‘जवान’चं प्रमोशन करतं असल्यासारखं वाटतं आहे. हे खरं आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, “सलमानला माझ्या प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणता लूक करण्याची गरज नाही. तो मनापासून माझ्यावर प्रेम करतो.”
हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये उर्मिला निंबाळकर जाणार का? उत्तर देत म्हणाली, “दुसऱ्या पर्वात…”
याचदरम्यान एका चाहत्यानं शाहरुखला एक मजेशीर प्रश्न विचारला. ज्यावर शाहरुखनेही मजेशीर उत्तर दिलं. या चाहत्यानं विचारलं की, ‘पत्नीबरोबर ‘जवान’ चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला आहे. पण ती नेहमी उशीरा करते. जेव्हा ‘पठाण’ एकत्र पाहण्यासाठी प्लॅन केला होता, तेव्हा सुद्धा तिनं उशीरा केला होता. त्यामुळे वेळेवर पोहोचण्यासाठी काहीतरी टिप्स दे.’
हेही वाचा – “‘या’ अभिनेत्यामुळे मी आता दगडाबरोबरही रोमान्स करू शकते”; मराठमोळ्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
यावर शाहरुख म्हणाला की, “ओके. आता या पुढे पत्नीच्या समस्येबाबतचे आणखी प्रश्न विचारू नका. प्लिज. मी माझीच सांभाळू शकत नाही, त्यात तुम्ही तुमची समस्या माझ्यावर सोपवत आहात. कृपा करून सर्व महिलांनी ‘जवान’ चित्रपट पाहण्यासाठी जा.”
हेही वाचा – “मराठी चित्रपटाबद्दल एक मोठा भ्रम आता मोडला”; केतकी माटेगावकरचं विधान, म्हणाली, “कोण म्हणतं ….”
दरम्यान, शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर नयनतारा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोणसह बऱ्याच महिला कलाकार आहेत. तसेच विजय सेतुपति खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.