बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. पण शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आतापासून या चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. शाहरुख हा असा अभिनेता आहे, जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो चाहत्यांबरोबर गप्पा मारण्यासाठी ट्वीटवर हजर होता. आज किंग खाननं चाहत्यांसाठी ट्वीटरवर ‘आस्क एसआरके’ सेक्शन घेतलं. यामध्ये चाहत्यांच्या काही प्रश्नांची त्यानं जबरदस्त उत्तर दिली.

हेही वाचा – “याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर…” प्रियदर्शनीनं शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर ओंकार राऊतची प्रतिक्रिया

एका चाहत्यानं असा काही प्रश्न विचारला, त्याचं शाहरुखनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय झालं आहे. पुष्कर नावाच्या एका चाहत्यानं किंग खानला विचारलं की, ‘नयनतारा मॅमवर फिदा झाला की नाही?’ यावर अभिनेता म्हणाला की, “चुप बसा. ती दोन मुलांची आई आहे. हा हा..”

हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…

तसेच आणखी एका चाहत्यानं मुलीला कसं इम्प्रेस करायचं याविषयी विचारलं. त्यावेळेस शाहरुख नाराज झाला. कारण चाहत्यानं लिहिलं होतं की, ‘सर, एखाद्या मुलीला कसं पटवायचं. काहीतरी टीप्स द्या.’ शाहरुख म्हणाला की, “पहिल्यांदा पटवायचं वगैरे म्हणून नकोस. ते चांगलं वाटतं नाही.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने पृथ्वीकचा अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानचा सांगितला किस्सा, म्हणाली, “दत्तूसाठी…”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत

दरम्यान, शाहरुखचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर नयनतारा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोणसह बऱ्याच महिला कलाकार आहेत. तसेच विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शाहरुख व पत्नी गौरी खाननं केली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम भाषांमध्ये ‘जवान’ प्रदर्शित होणार आहे.