बॉलीवूडच्या किंग खानसाठी २०२३ वर्ष हिट ठरलं आहे. या वर्षात शाहरुखच्या चित्रपटाचा नुसता बोलबोला सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत किंग खानने सुपरहिट चित्रपट देत आहे. २०२३च्या सुरुवातीलाच शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने धुमाकूळ घातला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ‘जवान’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडून बक्कळ कमाई केली. आता वर्षांच्या शेवटी शाहरुखचा ‘डंकी’ धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. २१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बादशहा देवदर्शन करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान वैष्णो देवीला पोहोचला होता. यावेळी त्याच्याबरोबर लेक सुहाना खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दिसली होती. त्यानंतर आता शाहरुख खानने लेकीबरोबर साईबाबांचं दर्शन घेतलं. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला ‘या’ गोष्टीचा आहे तिटकारा, म्हणाली, “लोकांसाठी तणावमुक्तीचं माध्यम पण माझ्यासाठी…”

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान, त्याची लेक आणि मॅनेजर पाहायला मिळत आहे. जेव्हा तो गाडीतून उतरतो तेव्हा शिर्डीत असलेले त्याचे चाहते एकच आवाज करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिनेता काही जणांची गाठभेट घेऊन पुढे साईबाबांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख साईबाबांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहे. तसंच आरती, प्रसाद घेताना तो पाहायला मिळत आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ चांगलंच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – तेजश्री प्रधान मालिकेच्या सेटवर राज हंचनाळेला सतत का ओरडत असते? जाणून घ्या…

दरम्यान, २१ डिसेंबरला शाहरुख खानच्या ‘डंकी’ बरोबर प्रभासच्या ‘सालार’ची टक्कर होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणाचा डंका वाजतोय हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. दोन्ही चित्रपटांचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. प्रेक्षकांमध्ये दोन्ही चित्रपटांच्याबाबतीत उत्कंठा पाहायला मिळत आहे.

Story img Loader