शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात शाहिद नेहमीपेक्षा हटके भूमिका साकारणार आहे. सध्या तो ‘ब्लडी डॅडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून यासाठी शाहिद अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत पत्नी मीरा राजपूतबाबत शाहिदने अनेक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : लैंगिक समानतेविषयी बोलणं आलिया भट्टला पडलं महागात; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “तुझ्या बोलण्याला…”

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात, परंतु अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने मीराच्या वाईट सवयींबाबत खुलासा केला आहे. शाहिद म्हणाला, मीराला एक अतिशय वाईट सवय आहे ती म्हणजे, “ती सकाळी कधीही लवकर उठत नाही, मला कोणत्याच गोष्टीचे क्रेडिट देत नाही. जेव्हा सकाळी ९ वाजता मी तिला उठवायला जातो तेव्हा ती भडकते. एवढी वर्षं झाली पण सकाळी उठवल्यावर तिची होणारी चिडचिड अद्याप कमी झालेली नाही.”

हेही वाचा : Video : “भाभी का ट्रेलर आया है” पापाराझींनी चिडवल्यावर सिद्धार्थ मल्होत्रा लाजला अन्…; व्हिडीओ व्हायरल

शाहिद पुढे म्हणाला, “मीरावर मी मनापासून प्रेम करतो, ती सुंदर आणि हुशार आहे. एवढेच नाही तर मीरा माणूस म्हणून खूप खरी आहे, असे लोक खूप कमी पाहायला मिळतात.” तसेच मीराची इच्छा होती की, मुलांनी माझा ‘जब वी मेट’चित्रपट पाहावा कारण, हा एकमेव चित्रपट आहे जिथे मी लोकांना मारत नाहीये आणि हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने चित्रपटगृहात जाऊन मुलांनी हा सिनेमा पाहिला, असेही शाहिदने सांगितले.

हेही वाचा : नवाजुद्दीनच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “आमचं नातं मैत्रीपेक्षा…”

दरम्यान, शाहिदचा आगामी ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट ९ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत रोनित रॉय, संजय कपूर, राजीव खंडेलवाल, डायना पेंटी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shahid kapoor gets annoyed by this habit of mira rajput sva 00