बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कायमच कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. शाहीद आणि मीराचे लग्न ७ जुलै २०१५ मध्ये झाले. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. त्या दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर होते. नुकतच शाहिदने मीराच्या आई-वडिलांबाबात भाष्य केलं आहे. सासू सासऱ्यांबरोबर आपले कसे संबंध आहेत याबाबत शाहिदने खुलासा केला आहे.
आपल्या सासऱ्यांसोबतच्या नात्याबद्दल बोलताना शाहिद कपूरने सांगितले की, “माझे सासरच्यांबरोबर खूप चांगले आणि मजबूत नाते आहे. मीराच्या आई-वडिलांबरोबर पहिल्या भेटीची आठवण सांगताना शाहिद म्हणाला की, जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटला तेव्हा ते अतिशय सामान्य दिसत होते. मीराच्या आई-वडिलांसारखे सासरचे लोक मला मिळाल्याने मी स्वत: ‘भाग्यवान’ समजतो. मी त्यांच्या खूप जवळ आहे.”
दरम्यान शाहिदने लॉकडाऊन काळातील आठवणही शेअर केली आहे. शाहिद म्हणाला, “जेव्हा मी पंजाबमध्ये दोन वर्षे राहत होतो त्यादरम्यान मी काही महिने सासरच्यांबरोबर घालवले होते. कोविडच्या काळात काही महिने मी मीराच्या आई-वडिलांबरोबर घालवले मीराचे कुटुंब अगदी सामान्य आहे आणि मला ते आवडतात”
नुकतचं शाहिद आणि मीराच्या लग्नानाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त शाहिदने सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट करत मीराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
शाहिदच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर शाहिद कपूरने ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ९ जून ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच शाहिद कपूर क्रीती सनॉंनबरोबर आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.