बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या यांची जोडी कायमच चर्चेत असते. या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळतं. अभिनय आणि कामासह शाहीद कायमच कुटुंबाला प्राधान्य देत असतो. शाहीदने नुकतंच त्याच्या मुलांबद्दल एक खुलासा केला आहे.
शाहीद कपूर हा सध्या ब्लडी डॅडी या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यानिमित्ताने नुकतंच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या मुलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तुझी मुलं तुझे चित्रपट पाहतात का? त्यांनी कधीतरी तुला चित्रपट कसे वाटतात याबद्दल सांगितले आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शाहीदने फारच छान पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
“माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहावेत, हे मला फारसं आवडत नाही. त्यांनी मला एकदा विचारलेले की तुम्हाला अनेक लोक पाहायला का येतात? पण माझ्या मुलांनी अद्याप माझे चित्रपट पाहिलेले नाहीत.”
“हल्लीच काही दिवसांपूर्वी त्यांनी माझा ‘जब वी मेट’ हा चित्रपट पाहिला. माझ्या आईने त्यांना तो चित्रपट दाखवला आणि माझी पत्नी मीरालाही त्यांनी तो चित्रपट पाहावा, असं वाटतं होतं. कारण या चित्रपटात तू कोणालाही मारहाण केलेली नाही आणि कोणतेही आक्षेपार्ह काम केलेले नाही. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे त्यांनी तो पाहावा असं मला वाटतं. माझ्यामते तरी ‘जब वी मेट’ हाच पहिला चित्रपट असेल जो माझ्या मुलांनी पाहिला.” असे शाहीदने सांगितले.
दरम्यान शाहीद आणि मीराचे लग्न ७ जुलै २०१५ मध्ये झाले होते. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. त्या दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर होते. लग्नानंतर वर्षभरातच मीराने मुलीला जन्म दिला. तिचं नाव मिशा असे आहे. त्यानंतर २०१८ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव झैन असे आहे.