Kiara Siddharth Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडयावर सातत्याने चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही काळापासून होताना दिसत होत्या. आता अखेर ६ फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. त्याचबरोबरीने बॉलिवूडचे काही कलाकार जैसलमेरला रवाना झाले आहेत
सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. मुंबईवरून अनेक मंडळी जैसलमेरला रवाना झाले आहेत. अशातच आता शाहिद कपूर, मीरा राजपूत आणि करण जोहर नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे कोण कोण कलाकार या विवाह सोहळयाला उपस्थित राहणार आहेत. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांनी कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केले होते.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबाबत अभिनेत्रीच्या वडिलांनी दिल्या खास शुभेच्छा; म्हणाले….
या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सनाही आमंत्रित केलं गेलं असल्याची चर्चा आहे. मीडिया रीपोर्टनुसार या सोहळ्यात या दोघांनी मोजक्याच लोकांना निमंत्रण दिलेलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण, कतरिना कैफ, रकुल प्रीत सिंग, जॅकी भग्नानी हे कलाकार या शाही विवाह सोहळ्यात हजेर लावतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सिद्धार्थने नुकतंच त्याच्या ‘योद्धा’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे तर कियारा सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ आणि राम चरणबरोबर ‘आरसी १५’ या चित्रपटांवर काम करत आहे. ६ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियारा लग्नबंधनात अडकणार आहेत हे दोघे एक मुंबईत आणि एक दिल्लीत असं रीसेप्शन ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे.