Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात, जल्लोषात पार पडला आहे. २९ मेपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता काल, १ जूनला झाली. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा क्रूझवर दुसरा प्री-वेडिंग सोहळा झाला. बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. तसंच या सोहळ्यातील कार्यक्रमात जगप्रसिद्ध अमेरिकन गायक, गायिका, बँडसह बॉलीवूडच्या गायकांनी परफॉर्मन्स केला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच शाहरुख खान व रणबीर कपूरचा एक फोटो खूपच चर्चेत आला आहे.

अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंह, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला खास हजेरी लावली होती. शाहरुख खान आपल्या कुटुंबासह या प्री-वेडिंगमध्ये एन्जॉय करताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

हेही वाचा – ‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर, पाहा Inside फोटो

याशिवाय शाहरुख खान एका फोटोमध्ये रणबीर कपूरबरोबर पाहायला मिळाला. या फोटोमध्ये शाहरुखची हेअरस्टाइल सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील राधेसारखी पाहायला मिळाली. तसंच त्यानं गळ्यात गमछा देखील घेतला होता. डॅशिंग लूकमधील शाहरुखच्या या फोटोने सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”

दरम्यान, अनंत-राधिकाच्या जामनगरमधील पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले होते. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला १२०० पाहुण्यांनी उपस्थितीत लावली होती. दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं १२ जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये लग्न होणार आहे. तसंच इथे इतर कार्यक्रम आणि रिसेप्शन देखील पार पडणार आहे. १३ जुलैला रिसेप्शन असणार आहे.

Story img Loader