बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शाहरुख खान मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये शाहरुख खानच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या पाहायला मिळत आहे. त्याच्या या मोशन पोस्टरचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या मोशन पोस्टरबरोबरच शाहरुखच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.
आणखी वाचा : ‘नयनतारा’बद्दल एका शब्दात काय सांगशील? शाहरुख म्हणाला, “ती अतिशय…”

विशेष म्हणजे शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. “गेली दोन वर्ष गाळलेला घाम, अश्रू आणि रक्त… अखेर माझा चित्रपट, आपला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात झळकणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले आहे. गिरीजाने या पोस्टबरोबर आणखी एक पोस्टही शेअर केली आहे. “‘जवान’ ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार! आम्ही जे तयार केले आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही!” असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

आणखी वाचा : गोपीनाथ मुंडेंचे निधन ते प्रीतम मुंडेंची खासदारकी, पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग 

गिरीजाने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने गिरीजाचे अभिनंदन केले आहे. तर अमृता खानविलकरने हार्ट आणि टाळ्या वाजवण्याचा इमोजी पोस्ट करत तिला प्रोत्साहन दिले आहे. त्याबरोबरच प्रिया बापट, स्पृहा वरद, मिथिला पालकर, अभिजित खांडकेकर या कलाकारांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shahrukh khan jawan movie motion poster releases this marathi actress will be part of film see post nrp
Show comments