प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांवर प्रश्न उपस्थित करीत, सोशल मीडियावर‘आदिपुरुष’चित्रपटाला ट्रोल केले जात आहे.

हेही वाचा : ‘द फॅमिली मॅन’साठी सलमान-शाहरुखएवढे मानधन मिळाले का? मनोज बाजपेयी म्हणाले, ” मी स्वस्तात काम…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. या सगळ्या वादादरम्यान, सोशल मीडियावर शाहरुख खान आणि गायत्री जोशी यांच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वदेस’ चित्रपटातील रामायणाचा एक सीन व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “प्रिय, बाबा तू कायम…” ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट, रितेश देशमुख कमेंट करीत म्हणाला…

“शाहरुख खान आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटातील रामायणावर चित्रित केलेला छोटासा सीन ओम राऊतच्या ५०० कोटींच्या ‘आदिपुरुष’पेक्षा खूप सुंदर आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ट्विटरवर दिल्या आहेत. अनेक युजर्सनी चित्रपटातील व्हीएफएक्स, संवाद आणि पात्रांचे पोशाख याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत “१९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्वदेस’ चित्रपटाकडून काहीतरी शिका” असा सल्ला ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना दिला आहे. या सीनमध्ये शाहरुख उपस्थित गावकऱ्यांना रामायणाचे महत्त्व सांगत आहे.

हेही वाचा : ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगना रणौतला आली इरफान खानची आठवण, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपट जगभरात १६ जूनला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ३७.२५ कोटींची कमाई करीत, जगभरात १४० कोटींचा गल्ला जमवला. यामध्ये प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

Story img Loader