अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम थरारक सामना रंगला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता या महामुकाबल्यात कोण विजयी ठरतंय? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. अशातच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामान्यावेळी अभिनेता शाहरुख खानच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथीला पालकर असे अनेक सेलिब्रिटी भारतीय संघाला चिअर करताना दिसत आहेत. अभिनेता शाहरुख खानने देखील आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली आहे. अशातच त्याचा लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
fritz sinner advance to final in 2024 us open
सिन्नेरचा अंतिम फेरीत प्रवेश ; उपांत्य लढतीत ड्रॅपरवर मात; अमेरिकेच्या फ्रिट्झचे आव्हान
American Jessica Pegula advances to US Open women singles final sport news
पेगुलाची अंतिम फेरीत धडक, मुचोव्हावर मात; आता अरिना सबालेन्काचे आव्हान
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
Yuvraj Singh Biopic Announced Bhushan Kumar And Ravi Bhagchandka Will Produce
Yuvraj Singh Biopic: वर्ल्डकप हिरो ते कर्करोगावर मात; युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा, मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास
pat cummins india marathi news
Pat Cummins: भारताविरुद्ध ग्रीन, मार्शने गोलंदाजीत अधिक जबाबदारी घेणे अपेक्षित – कमिन्स

हेही वाचा – अमृता देशमुखच्या वहिनीने दिल्या खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली, “अभी तो…”

या व्हायरल व्हिडीओमधील शाहरुखच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं असून त्याचं कौतुक केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याच्या बाजूला आशा भोसले बसलेल्या पाहायला मिळत आहे. यावेळी आशा भोसले रिकामी चहाचा कप आणि बशी घेऊन बसल्या असतात. हे पाहून बाजूला बसलेला शाहरुख उठतो. आशा भोसले यांच्या हातातली कप-बशी घेतो आणि तो ठेवायला जातो. तितक्यात दुसरा व्यक्ती येऊन शाहरुखच्या हातातली कप-बशी घेऊन जातो. अभिनेता पुन्हा येऊन आशा भोसले यांची विचारपूस करताना दिसतो आणि मग तो स्वतः पुन्हा आपल्या जागी बसतो.

हेही वाचा – “तुझ्या निर्णयाचं आणि…”, प्रसाद ओकचा लेक झाला पदवीधर, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

शाहरुखचा हा व्हायरल व्हिडीओ जावेद फॅन या एक्स (ट्विटर)वर शेअर करण्यात आला आहे. “एकच हृदय किती वेळा जिंकशील खान साहेब” असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर शाहरुखच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “माझी खात्री आहे की…” भारत-ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यापूर्वी उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया, म्हणाली, “मी विश्वचषकाला किस….”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने बहिणीच्या लग्नातले खास फोटो केले शेअर; म्हणाला, “अमृता खूप…”

दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘जवान’ चित्रपटानंतर त्याचा ‘डंकी’ हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.