टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीगच्या रविवारच्या टी-२० सामन्यात पदार्पण केलं. आयपीएलच्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यावेळी अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अर्जुनने शेवटच्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेता शाहरुख खानने याबद्दल ट्वीट केले आहे.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने कोलकाता नाईट रायडर्स या संघाविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या अर्जुनने शानदार गोलंदाजी केली. त्याने २०व्या षटकात फक्त ५ धावा खर्च करून दोन विकेट घेतल्या. अर्जुनच्या दुसऱ्या चेंडूवर अब्दुल समद धावबाद झाला. तर पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनची आयपीएलमधील ही पहिली विकेट आहे. त्याने सामन्यात २.५ षटके टाकली आणि १८ धावा दिल्या.
आणखी वाचा : IPL 2023 MI vs SRH: मुंबई इंडियन्सची हॅटट्रिक! हैदराबादवर १४ धावांनी रोमांचक विजय
अर्जुनचा खेळ पाहिल्यानंतर शाहरुख खानने त्याच्यासाठी खास ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने त्याचे कौतुक केले आहे. तसेच शाहरुखने सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे. त्याबरोबर त्याने अर्जुनला पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
“आयपीएल कितीही स्पर्धात्मक असो… पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राचा मुलगा अर्जुनला मैदानात उतरुन खेळताना पाहता, तेव्हा खूप आनंद वाटतो. ही नक्कीच एक आनंदाची गोष्ट असते. अर्जुनला खूप खूप शुभेच्छा आणि सचिन… खरंच किती अभिमानाचा क्षण आहे. . खूपच छान!” असे ट्वीट शाहरुखने केले आहे.
आणखी वाचा : “आम्ही आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे”, हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली “ते केल्यामुळेच…”
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना फारच रोमांचक ठरला. मुंबईने हा सामना १४ धावांनी जिंकला. मुंबईने १९२/५ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात एसआरएचा संघ १९.५ षटकात १७८ धावांवर आटोपला. शेवटच्या षटकात सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २० धावांची गरज होती, पण अर्जुनने शानदार गोलंदाजी केली. त्याने २०व्या षटकात फक्त ५ धावा खर्च करून भुवनेश्वर कुमारची शिकार केली. भुवी आऊट झालेला शेवटचा खेळाडू होता. त्याने ५ चेंडूत २ धावा केल्या. अर्जुनची आयपीएलमधील ही पहिली विकेट आहे. त्याने सामन्यात २.५ षटके टाकली आणि १८ धावा दिल्या.