Shahrukh Khan: दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. शाहरुख खानचा मुलगा अबराम, सैफ अली खान-करीना कपूरचा मुलगा तैमुर, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या अशा बऱ्याच सेलिब्रिटींच्या मुलांनी स्नेहसंमेलनात खास कला सादर केली. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनात शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) मुलगा अबराम खानने ख्रिसमस थीमवर आधारित असलेल्या नाटकात स्नोमॅनची भूमिका साकारली होती. या नाटकात अबरामबरोबर आराध्या बच्चन देखील पाहायला मिळाली. याचे व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहेत. या व्हिडीओंमध्ये शाहरुखसह गौरी खान, सुहाना खान अबरामला प्रोत्साहन देताना दिसत आहे. या कार्यक्रमासाठी शाहरुखने खास लूक केला होता.
शाहरुख खानने ( Shahrukh Khan ) गडद निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. ज्यावर त्याने एक नेकलेस परिधान केला होता; या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लेकाच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुखने गळ्यात हर्मीसचा नेकलेस ( Hermes Medor XO Noir Necklace ) परिधान केला होता. या नेकलेसची किंमत जवळपास ६३ हजार ८२९ रुपये इतकी आहे.
हेही वाचा – “आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
दरम्यान, शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) ११ वर्षांचा मुलगा अबरामने वडील आणि भाऊ आर्यन खानसह डिज्नी लाइव्ह अॅक्शनच्या ‘मुफासा: द लायन किंग’ चित्रपटात आवाज दिला होता. आज, २० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. २०१९मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला रीमेक ‘द लायक किंग’ चित्रपटासारखा ‘मुफासा: द लायन किंग’ देखील १० कोटींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.