बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, शाहरुखबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये शुटिंगदरम्यान शाहरुखला दुखापत झाली आहे. वाढत्या रक्तस्त्रावामुळे शाहरुखवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “जब तक है… मध्ये कतरिनाला किस करण्यासाठी मला..”; चित्रपटातील ‘त्या’ सीनबाबत शाहरुख खानचा धक्कादायक खुलासा

ई टाईम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता. शुटिंगदरम्यान त्याच्या नाकाला दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शस्त्रक्रियेनंतर शाहरुख भारतात परतला असून तो या दुखापतीतून सावरत आहे.

शाहरुखच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे तर, या वर्षी रिलीज झालेल्या पठाण या चित्रपटाने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. जगभरात या चित्रपटाने १ हजार कोटींची कमाई केली आहे. शाहरुखचा आगामी ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor sharukh khan gets injured during shooting in los angeles dpj