ऐंशीच्या दशकात बॉलिवूडमध्ये संजय दत्त, जॅकी श्रॉफ अनिल कपूर यांसारखे अॅंक्शन हिरो रुपेरी पडदा गाजवत होते. यांच्याबरोबरीने आणखीन एक अभिनेता उदयास आला तो म्हणजे शेखर सुमन, रुपेरी पडद्याप्रमाणे त्यांनी छोट्या पडद्यावर छाप पाडली. नव्व्दच्या दशकात टीव्हीवर ते सूत्रसंचालक म्हणून काही कार्यक्रमात दिसले. तसेच अनेक वर्ष ते विनोदी कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून काम करत होते. मात्र करियरच्या सुरवातीलाच त्यांनी बॉलिवूडच्या अभिनेत्रींबरोबर बोल्ड सीन्स दिले होते.
मूळचे पाटणाचे असलेले शेखर सुमन यांनी अभिनयात करियर करण्यासाठी मुंबई गाठली. करियरच्या सुरवातीलाच त्यांना ‘उत्सव’ नावाचा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी कपूर आणि गिरीश कर्नाड यांनी केले आहे. या चित्रपटात रेखादेखील होत्या. पहिल्याच चित्रपटात त्यांनी रेखाबरोबर बोल्ड सीन्स दिले होते. या सीन्सची जोरदार चर्चा तेव्हा झाली होती. माध्यमांच्या माहितीनुसार बोल्ड सीन्सचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक तास लागले होते. हा चित्रपट पौराणिक कथेवर आधारित होता.
करियरच्या सुरवातीलाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट केल्यानंतर त्यांनी तद्दन व्यावसायिक चित्रपटात त्यांनी काम केले. नाचे मयूरी’, ‘संसार’, ‘त्रिदेव’, ‘पति परमेश्वर’, ‘रणभूमि’, ‘चोर मचाए शोर’, ‘एक से बढ़कर एक’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मोठ्या पडद्यानंतर त्यांनी दूरदर्शनवरील ‘वाह जनाब’ या मालिकेतून ते छोट्या पडद्याकडे वळले. देख भाई देख सारख्या गाजलेल्या मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यांचा मुलगा अध्ययन सुमनदेखील बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये दिसला आहे.